ODI World Cup 2023 : ईडन गार्डनच्या ड्रेसिंग रुमला आग; प्रचंड नुकसान…
Updated On:

कोलकाता :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी येथील ईडन गार्डन स्टेडियमवर नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच अचानक ड्रेसिंग रूमला आग लागल्याची घटना घडली.
अग्निशमन दलाचे बंब व पथकाने काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवले असले तरीही यात ड्रेसिंग रूमचे प्रचंड नुकसान झाले आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना ही घटना घडल्याने पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
आता ड्रेसिंग रूम व त्यातील अत्याधुनिक सुविधा नव्याने निर्माण कराव्या लागणार असून संघटनेला बीसीसीआयने मदत केली नाही तर मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नशिबाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.





