Pune News : आयुक्तांसमोरच अश्लील गाणी आणि हातवारे; अलका चौकातील प्रकाराने पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह
Pune News : अलका चौक परिसरात काही गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजवण्यात आल्याचा आणि आक्षेपार्ह हातवारे व हावभाव करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अलका चौक परिसरात काही गणेश मंडळांकडून मोठ्या आवाजात अश्लील गाणी वाजविण्यासह आक्षेपार्ह हातवारे आणि हावभाव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तासाठी उपस्थित असतानाही असे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Pune News)
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. मात्र, काही मंडळांकडून सुरू असलेल्या अश्लील गाण्यांमुळे आणि आक्षेपार्ह हावभावांमुळे बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागल्याची चर्चा आहे. (Pune News)
अलका चौक परिसरात काही मंडळांच्या मिरवणुकीदरम्यान अश्लील गाणी वाजविण्यात आली. त्यावर काही तरुणांकडून आक्षेपार्ह हातवारे आणि हावभाव करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असतानाही हा प्रकार सुरू राहिल्याने नियमांची अंमलबजावणी नेमकी कितपत होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Pune News)
नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार का?
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विविध नियम आणि मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. ध्वनिप्रदूषण, आक्षेपार्ह गाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असतानाही प्रत्यक्ष मिरवणुकीत असे प्रकार घडल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (Pune News)
दरम्यान, संबंधित मंडळांचे व्हिडिओ किंवा छायाचित्रांच्या आधारे तपास करून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते आणि नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई होते का, याकडे आता लक्ष लागले आहे. (Pune News)
Pune News : विसर्जन करून परतताना अपघात; ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू





