Nushrratt Bharuccha : इस्त्रायल युद्धात अडकलेली अभिनेत्री ‘नुसरत भरुचा’ सुखरुप भारतात परतली

Nushrratt Bharuccha – पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायल (Israel Palestine Crisis) यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी हमासने इस्रायलच्या दिशेने सुमारे 5,000 रॉकेट डागले.
यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली. सध्या इस्रायल आणि हमास दहशतवादी गटात जोरदार युद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सगळ्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी इस्त्रायलमध्ये गेलेली बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) सध्या भारतात परतली आहे.
#WATCH | Actress Nushrratt Bharuccha arrives at Mumbai airport from Israel https://t.co/kLfmKomeN3 pic.twitter.com/FqyhOtj9FZ
— ANI (@ANI) October 8, 2023
शुक्रवारी रात्री पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला (Israel Palestine Crisis) केल्यामुळे अभिनेत्री इस्त्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती.
युद्धारंभानंतर तिच्याशी संपर्क तुटल्याने संपूर्ण बॉलिवूड आणि अभिनेत्रीने चाहते चिंता व्यक्त करत होते. मात्र, आता नुसरत आपल्या मायदेशी भारतात परतली आहे.
नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) हिच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात अभिनेत्री सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नुसरत हिची चर्चा सुरु आहे.
अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्रायलहून मुंबई विमानतळावर पोहोचली असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.





