जिल्हा रुग्णालयात नर्सने लगावली डॉक्टरच्या कानशिलात; व्हिडीओ व्हायरल
मुंबई – देशात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे. अनेक दवाखान्यात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. या रुग्णांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिकवेळ काम करावं लागत असून त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये चिडचिड वाढल्याचं चित्र आहे. उत्तर प्रदेशामधून एक धक्कादायक घटना समोर आली असून येथे नर्सने डॉक्टरच्या कानशिलात लागवल्याचं समोर आलं आहे.
रामपूरमधील जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यात वाद झाला होता. त्यांचा हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर चिडलेल्या नर्सने डॉक्टरांच्या कानशिलात लगावली. त्यावर डॉक्टरने देखील प्रतिक्रिया देत नर्सला मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. रामपूर जिल्हा रुग्मालयात करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी फाईलवरील स्वाक्षरी करण्यावरून नर्स आणि डॉक्टर यांच्यात वाद झाला. या वादात नर्सने निवृत्त डॉक्टर बीएम नागर यांच्यावर हात उचलला.





