IAS Pooja Khedkar | पूजा खेडकरच्या नगर कनेक्शनमधून धक्कादायक माहिती उघड; पाय आणखी खोलात जाणार….

IAS Pooja Khedkar | Ahmednagar : मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवे कारनामे उघडकीस येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत असल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत.
तसेच पूजा खेडकर यांनी अपंग असलेले सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष असल्याचे सर्टिफिकेट दाखवून आयएएस पदरात पाडून घेतलं आहे.
पूजा यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून नेत्र दिव्यांक व मानसिक आजारपणाचे प्रमाणपत्र दिल्याचं बोललं जात होतं. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयकडून माहिती मागविण्यात आली आहे.
त्यानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली असता खेडकर यांना नेत्र दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे पुरावे आढळून आले आहेत.
तत्कालीन वैद्यकीय मंडळाने 2021 मध्ये एकत्रित करून दोन्ही याचे प्रमाणपत्र दिल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता पुढे आणखी किती कारनामे उघडकीस होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत डॉ. पुजा खेडकर?
पुजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी असून, जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्याने वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची एका दिवसापूर्वीच वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.
पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत.
सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
‘7 फ्लॅट, 17 लाखाच घड्याळ अन् बरच काही…’; पूजा खेडकर यांची संपत्ती, पाहा…
IAS officer Puja Khedkar’s parents, having a non-creamy layer certificate, possess property that includes 110 acres of agricultural land, violating the Agricultural Land Ceiling Act, 6 shops (1.6 lakh sq ft), 7 flats, including one in Hiranandani; 900 grams of gold, diamonds, a… pic.twitter.com/V9u1P5CQ0O
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 11, 2024
पूजा खेडकर यांच्या संपत्तीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी डॉ. पूजा खेडकर यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र असून 110 एकर शेतजमीन आहे. ही मालमत्ता म्हणजे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचे उल्लंघन आहे, असा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे.
त्यांनी ट्विटमध्ये फोटो शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. 1.6 लाख चौरस फुटाची 6 दुकान आहेत. 7 फ्लॅट असून यात हिरानंदानी या पॉश वस्तीत एक फ्लॅट आहे. 900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाख रुपये किंमतीच सोन्याचं घड्याळ आहे.
4 कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. स्वत: पूजाकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची चौकशी व्हायला नको का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.





