देशांतील करोनाग्रस्तांचा आकडा 49 लाखांवर !
Updated On:

नवी दिल्ली – देशातील करोनाग्रस्तांचा आकडा आता 49 लाखांच्यावर गेला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या अपडेट्मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत देशात करोनाचे एकूण 83 हजार 809 रुग्ण आढळून आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. गेले काही दिवस रोज 90 हजारांहून अधिक करोनाग्रस्त रुग्ण आढळून येत होते. त्या तुलनेत आजचा आकडामात्र काहीसा कमी आहे.
दरम्यान या नव्या रुग्णांमुळे एकूण करोनाग्रस्तांचा आकडा आता 49 लाख 30 हजार 236 इतका झाला आहे. सध्या देशात कोविड 19 चे 9 लाख 90 हजार 61 सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या चोवीस तासांत करोनामुळे एकूण 1054 रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या आता 80 हजार 776 इतकी झाली आहे. त्यातील सर्वाधिक 29 हजार 894 रुग्ण भारतातील आहेत.





