Asian Shooting Championship : भारतीय संघ जाहीर; पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविण्याची आणखी एक संधी..

नवी दिल्ली :- भारतीय नेमबाजांना 2024 पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. कारण भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (एनआरएआय) शनिवारी आगामी आशियाई नेमबाजी स्पर्धेसाठी आपल्या संघाची निवड केली आहे.
ही खंडीय स्पर्धा 22 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोरियाच्या “चांगवॉन’ येथे होणार आहे.
मनू भाकर, दिव्यांश सिंग पनवार, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर, अखिल शेओरान, रिदम संगवान, ईशा सिंग, आदर्श सिंग, किनान चेनई, गनेमत सेखॉन यांना या संघात संधी देण्यात आली आहे. यांच्यासाठी पुढील उन्हाळ्याच्या पॅरिससाठी कोटा सुरक्षित करण्याची आणखी एक संधी असेल.
यापूर्वी भारताच्या राजेश्वरी कुमारी, मेहुली घोष(10 मीटर एअर रायफलमध्ये), अखिल शेओरन(50 मीटर रायफल 3-पोझिशन), सिफ्ट कौर साम्रा(महिलांच्या 50 मीटर रायफल पोझिशन), भौनीश मेंदिरट्टा, रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील (पुरुष 10 मीटर एअर रायफल), आणि स्वप्नील कुसळे (पुरुष 50 मीटर रायफल) या सात नेमबाजांनी ऑलिम्पिकचे तिकीट मिळविलेले आहे.





