National Rifle Association of India : कालिकेश सिंग देव यांची ‘एनआरएआय’च्या अध्यक्षपदी निवड….

National Rifle Association of India : कालिकेश नारायण सिंह देव यांची नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 21 सप्टेंबर 2024 रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांना 36 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी व्ही.के. ढाल यांना 21 मते मिळाली. या निवडणुका राजस्थान उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश अनिल देव सिंग यांच्या देखरेखीखाली घेण्यात आल्या, जे निवडणूक अधिकारी होते.
निवडणुकीसाठी एनआरएआयची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. 67 पात्र सदस्यांपैकी 57 सदस्यांनी गुप्त मतदानाद्वारे मतदान केले. कालिकेश नारायण सिंह यांची 12 महिन्यांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे. कालिकेश 2025 पर्यंत एनआरएआय (NRAI) चे अध्यक्ष राहतील.
Many congratulations 🎉 to new @OfficialNRAI President Kalikesh Narayan Singh Deo @DeoKalikesh as he overcomes the challenge of Mr. V.K. Dhall 36-21 at the elections held today at the @ccoi_1947 . We wish him all the best!👏#IndianShooting #NRAIPresident pic.twitter.com/MQskIKnwa2
— NRAI (@OfficialNRAI) September 21, 2024
ओडिशाचे माजी खासदार कालिकेश गेल्या वर्षी रानिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर एनआरएआयचे दैनंदिन कामकाज पाहत होते. मागील वर्षी, क्रीडा मंत्रालयाने निर्देश जारी केले होते की, राष्ट्रीय क्रीडा महासंघाचा कोणताही अधिकारी राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार 12 वर्षांपेक्षा जास्त काळ या पदावर राहू शकत नाही. यानंतर रणिंदर यांनी 29 डिसेंबर 2010 ते 29 डिसेंबर 2022 रोजी 12 वर्षे पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला होता.
IND vs BAN 1st Test (Day 3 Stumps) : तिसऱ्या दिवशीही भारताचे वर्चस्व, विजयापासून आणखी 6 विकेट्स दूर…
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रणिंदर यांच्या राजीनाम्यानंतर एनआरएआयचे कामकाज वरिष्ठ उपाध्यक्ष कालिकेश पाहत होते. त्यांच्या कार्यवाहक प्रमुखपदाच्या कार्यकाळात पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताने नेमबाजीत तीन पदके जिंकली. रिओ ऑलिम्पिक 2016 आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 मधून भारतीय नेमबाज मात्र रिकाम्या हाताने परतले होते.

