आता वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवास होणार सुपरफास्ट; मिळणार ‘या’ सुख-सुविधा

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या तीन झाली असून, देशातील एकूण संख्या 10 झाली आहे. पंतप्रधान मोदींनी इतरही विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी ‘रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतीक असल्याचे’ प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
दरम्यान, रेल्वेकडून हा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात आली असून, वंदे भारत एक्सप्रेसमधील सुख सुविधा या अन्य रेल्वेपेक्षा अत्यंत आरामदायी आणि सुटसूटीत आहे. याशिवाय, ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक प्लग दरवाजे, टच-फ्री स्लाइडिंग दरवाजे अश्या अनेक जबरदस्त सुख सुविधा या रेल्वेत आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसमधील सुख सुविधा….
सोलापूर वंदे भारत ट्रेनसाठी 1,000 रुपये आणि एक्झिक्युटिव्हसाठी 2,015 रुपये असेल
एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फिरणारी जागा
प्रत्येक डब्यात 32 इंच प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टम
प्रत्येक डब्यात आपत्कालीन प्रकाश व्यवस्था, आपत्कालीन टॉक-बॅक युनिट्स
जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिवा
दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष स्वच्छतागृह
बायोव्हॅक्यूम टॉयलेट, चार प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे, कवच इत्यादी…





