“आता धर्मासाठी लढायचं…”; उरण घटनेप्रकरणी केतकी चितळेने व्यक्त केला संताप

Ketaki Chitale On Uran Case | नवी मुंबई येथील उरणमध्ये राहणारी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत शनिवारी मृतदेह आढळून आला. तरुणीची हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली. तिला न्याय मिळावा यासाठी उरणमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. यातच आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने एक व्हिडिओ शेअर करत या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. यशश्रीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
केतकीने पोस्ट करत लव्ह जिहादचा मुद्दाही मांडला आहे. व्हिडीओमध्ये केतकी म्हणते की, “लव्ह जिहाद फक्त बिहार, केरळ, पश्चिम बंगालमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त मुस्लिमांचा प्रभाव असेलल्या राज्यात होतोय हे खोटं आहे. लव्ह जिहादचं प्रमाण फक्त ग्रामीण भागात आहे, हे खोटं आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला लव्ह जिहादला बळी पडताय, हे खोटं आहे. जिथं जिथं हिंदू आहेत तिथं तिथं लव्ह जिहाद आहे.”
&n
View this post on Instagram
“आपल्याला आता धर्मासाठी लढायचे आहे, पोलीस आपल्या बाजूने नाही, प्रशासन आपल्या बाजूने नाही. आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्या मुली गायब होतायत. कधी फ्रीजमध्ये सापडतात, कधी कपाटात ,तर कधी समुद्रात. नाही तर सुटकेसमध्ये. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले. आपल्याला आता धर्मासाठी लढायचं आहे. पोलिस आपल्या बाजूने नाहीत. प्रशासन आपल्या बाजूने नाही. आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे.’ तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.
उरणमध्ये तरुणीची हत्या
उरणमधील येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. या तरुणीची हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली. तिचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळल्या. यशश्री शिंदे बेलापूरमध्ये एका कंपनीत कामाला होती आणि उरणमध्ये तिच्या कुटुंबियांसह राहत होती.
25 जुलै रोजी ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली होती, मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि यशश्री बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळीत झाडीत एक मृतदेह आढळून आला. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे.





