‘हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी’; केतकी चितळेची PM मोदींकडे मागणी

Ketaki Chitale | लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तसेच मंत्रीपदाचे खाते वाटप देखील करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री केतकी चितळेने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. केतकी नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने मोदींचा फोटो शेअर करत ‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी’ अशी मागणी केली आहे.
मोदींनी पंतप्रधानपदाची शप्पथ घेतल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे हिने त्यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मागणी केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दिसत आहे. पोस्ट शेअर करताना तिने ‘हिंदू राष्ट्र चाहिए हमें प्रधानमंत्रीजी’ असं कॅप्शन देत तिने पोस्ट शेअर केलेली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक यावर कमेंट करत तिच्यावर टीका केली आहे. Ketaki Chitale |
View this post on Instagram
केतकीने काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीवर हल्ला झाला. कुठे आहे ऑल आईज ऑन रफाह वाले लोक? हिंदू राष्ट्राची आमची मागणी पूर्ण करा,’ असे तिने या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान, आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी कायमच चर्चेत असते. तसेच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला तुरुंगात देखील जावं लागलं आहे. पण तरीही ती तिची स्पष्ट मतं सोशल मीडियावर कायमच मांडत असते. सध्या केतकीने केलेली पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हेही वाचा :
बिश्नोई गँगचे संभाजीनगर ‘कनेक्शन’; सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील एकाला ‘अटक’





