रिझर्व्ह की ओपन? सर्व्हेसाठी आलेल्या महिलेला केतकी चितळे म्हणते, ‘मी कोकणस्थ ब्राह्मण…’, पुढे काय घडलं पाहा Video

Ketaki Chitale : अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. मग कधी ती सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करते तर कधी एखाद्या राजकारणी नेत्याशी पंगा घेते. केतकी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. आता देखील तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चांगलीच प्रसिद्धही झोतात आली आहे.
झालं असं की केतकीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रावर स्वतःचा एक व्हडिओ शेअर केला. आता तिची ही इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 23 जानेवारी पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे यासंदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आणि आता यावरच केतकीने भाष्य केलं आहे.
नेमकं केतकी चितळे आपल्या व्हिडिओत काय म्हणाली, पाहा….
View this post on Instagram
केतकी चितळेने एका महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने व्हिडिओमध्ये ‘तुम्ही नेमक्या महानगरपालिकेकडून आल्या आहेत ना? सगळ्यांना जात विचारली जात आहे, रिझर्व्ह की ओपन? असा सवाल केतकी चितळे त्या महिलेला विचारताना दिसते. त्यावर सर्व्हेसाठी आलेली महिला मराठा आरक्षणासाठी, मराठा आरक्षण मिळण्यासाठी सर्व्हे सुरू असल्याचं म्हणते.
त्यावर केतकी त्या महिलेला तुमची जात कोणती असा सवाल करते. महिला ओपन मराठा असं सांगते. ती महिला नंतर केतकीला तुम्ही पण मराठा का? असा सवाल करते. त्यावर केतकी अजिबात नाही…चितपावन कोकणस्थ ब्राह्मण असल्याचं सांगते. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आरक्षणासाठी लोक प्रश्न विचारत आहेत. सर्वांसाठी कायदा सारखा नाही असंही ती व्हिडिओमध्ये बोलताना दिसते.
सर्वांसाठी कायदा सारखा आहे की प्रत्येकाच्या जातीनुसार त्याला वेगवेगळा कायदा, नियम आहे.. आजच्या प्रजासत्ताकदिनी महानगरपालिकेकडून लोकांना पाठवून सर्व्हे सुरू आहे. या राष्ट्रातील नागरिकांना समान अधिकार, समान कायदा, समान नियम नाही असंही तिने म्हटलं आहे. समजून घ्या आणि विचार करा…’ असं म्हणत तिने व्हिडिओचा शेवट केला आहे.





