आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा तापणार; 21 डिसेंबरला विधानभवनावर ‘एमआयएम’चा भव्य मोर्चा

औरंगाबाद – राज्याचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होत आहे. यादरम्यान, 21 डिसेंबर रोजी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मुस्लीमांना पाच टक्के आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. जलील यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. मोर्चा नागपूरच्या इंदोर मैदानापासून निघणार असून विधानभवनावर जाऊन धडकणार आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील औरंगाबाद ते मुंबई असा एमआयएमकडून मोर्चा काढण्यात आला होता.
जलील यांच्या प्रमुख मागण्या –
1) मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे.
2)वक्फ बोर्डाच्या जागा सुरक्षित करणे आणि त्यावरील अनाधिकृत अतिक्रमण काढणे बाबत.
3)मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींचा अनुदान देण्याची मागणी.
4)झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देणे.
5)हातमाग आणि यंत्रमाग विणकरांना रोजगार देण्यासाठी आर्थिक मदत करावी.
मैं नागपुर आऊंगा। आप भी शामिल हों। pic.twitter.com/8tfA8pHEgq
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) December 15, 2022




