Asaduddin Owaisi: बुरखा, नकाब आणि एक धार्मिक पुस्तक कधीपासून अवैध झाले? असदुद्दीन ओवेसींचा सवाल
Asaduddin Owaisi: "मुस्लीम समाजातील सुशिक्षित तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे," ओवेसींचा आरोप

Asaduddin Owaisi: एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसी यांनी नाशिकच्या TCS धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानचे समर्थन केले आहे. गेल्या महिन्याभरापासून पोलिसांना गुंगरा देणाऱ्या निदा खानला अखेर छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली.
एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने या प्रकरणातील संशयित आरोप निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला होता. पोलीस जवळपास महिन्याभरापासून तिला शोधत होते. या प्रकरणी मतीन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल झालाय आणि त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Chandrashekhar Bawankule : मीरा-भाईंदरमधील जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार : बावनकुळे
यानंतर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निदा खान हिची पाठराखण केली. ते म्हणाले, “टीसीएस कंपनीचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल की, त्या मुलीचा संबंध एचआर विभागाशी नव्हता. या प्रकरणात 9 एफआयआर रजिस्टर झाले आहेत.
त्यापैकी एक एफआयआरमध्ये हर्टिंग रिलेजन सिंटेमेंटच्या नावाने निदा खान या मुलीचे नाव लिहिले गेले. तिसरी गोष्ट म्हणजे एफआयआर दाखल होण्यापूर्वीच या मुलीचे ट्रान्सफर झाले होते. तिचा या कंपनीशी कोणताही संबंध नाही”, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला.
नाशिक धर्मांतरण प्रकरण हा द्वेष भावनेतून केला आहे. ज्याने हा गुन्हा दाखल केला आहे तो सत्ताधारी पक्षाचा आहे. तिच्यावर केवळ आरोप झाले म्हणून तिची मीडिया ट्रायल करून तिला दोषी ठरवण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. Asaduddin Owaisi
सध्या तरी कोणताही निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. आम्ही या गोष्टीचं खंडन करतो. काही लोकं या गोष्टीचं मीडिया ट्रायल करत आहेत. मीडिया जर ज्युरीचे काम करणार तर हे धोकादायक आहे”न्यायालय या मुलीला निर्दोष ठरवेल असा विश्वास असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला.
बुरखा, नकाब आणि एक धार्मिक पुस्तक कधीपासून आक्षेपार्ह झाल्या?
या प्रकरणातील एफआयआर बघितल्यावर समजेल की, संबंधित मुलीच्या घरातून एक बुरखा, नकाब आणि एक धार्मिक पुस्तक मिळल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सगळ्या वस्तू आक्षेपार्ह कधीपासून झाल्या, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला.
याआधी दिल्ली पोलिसांनी अशाचप्रकारे काही मुलांना अटक केली होती. पोलिसांनी काय म्हटलं होतं की, त्यांच्या घरातून मिर्झा गालिबचे पुस्तक मिळाले त्यामुळे ते दहशतवादी आहेत. पण कोर्टाने नंतर त्या गोष्टीला नाकारला. आताच इलाहबाद हायकोर्टाचे एक जजमेंट आलं आहे. कुणीतरी उर्दू शेर लिहिला. तर कोर्टाने सांगितलं की, शेर लिहिला तर काय झालं? त्यामुळे कोर्ट योग्य न्याय देईल”, असं ओवेसी म्हणाले.
“मुस्लीम समाजातील सुशिक्षित तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय”
“त्यामुळे या मुलीची कोर्टाकडून निर्दोष सुटका होईल. तिच्यावर कोणतीही केस दाखल होणार नाही. हे सगळं मुस्लीम समाजातील सुशिक्षित तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला खात्री आहे की, कायदा आपलं काम करेल. तुम्ही कुणाला आरोपी बनवता तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्याला शिक्षा झाली. जो हा आरोप करत आहेत ते केवळ एका द्वेषापोटी करत आहेत. न्याय प्रक्रिया आपलं काम करेल. कायद्याने जे होईल ते आपल्यासमोर येईल. पण या प्रकरणाला कोणत्या पक्षासोबत जोडणं योग्य नाही”, अशी भूमिका ओवेसी यांनी मांडली. Asaduddin Owaisi
हेही वाचा:






