“आता संसदेत स्वतः मोदींनी स्पष्टीकरण द्यायला हवे”; ट्रम्प यांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

Jairam Ramesh | पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माझ्यामुळेच भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती झाल्याचे सांगितले. यानंतर आता ट्रम्प यांनी नवा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेतल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारला घेरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आत्मसन्मानाशी तडजोड का केली? मोदी यांनी व्यवसायासाठी देशाच्या सन्मानाशी तडजोड केली का, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या बरोबर २ दिवसाआधी, ट्रम्प यांनी २४ व्या वेळी सांगितले की, मी व्यापाराची धमकी देऊन भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले. ट्रम्प हे सतत युद्ध थांबवल्याची पुनरावृत्ती करत आहेत आणि नरेंद्र मोदी गप्प आहेत. मग नरेंद्र मोदींनी व्यापारासाठी देशाच्या सन्मानाशी तडजोड केली, हे खरे मानायचे का?”
संसद के मानसून सत्र की शुरुआत से ठीक दो दिन पहले, ‘ट्रंप मिसाइल’ 24वीं बार दागी गई -और हर बार की तरह इस बार भी वही दो बातें दोहराई गईं:
1. अमेरिका ने भारत और पाकिस्तान,दो परमाणु संपन्न देशों के बीच युद्ध रोक दिया।
2. अगर युद्ध जारी रहा , तो कोई व्यापार समझौता नहीं होगा । यानी… https://t.co/5OzmvSZquG
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 19, 2025
पुढे जयराम रमेश म्हणाले की, “यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक खळबळजनक नवीन खुलासा केला आहे. ते सांगतात की, पाच जेट विमाने पाडली असावीत. सप्टेंबर २०१९ मध्ये ‘हाउडी मोदी’ आणि फेब्रुवारी २०२० मध्ये ‘नमस्ते ट्रम्प’च्या काळापासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी वर्षानुवर्षे मैत्री आणि मिठी मारणारे पंतप्रधान मोदी यांना आता गेल्या ७० दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काय दावा करत आहेत याबद्दल संसदेत स्वतः स्पष्ट विधान केले पाहिजे.” Jairam Ramesh|
ट्रम्प काय म्हणाले ?
ट्रम्प शुक्रवारी म्हणाले की, “आम्ही अनेक युद्धे थांबवली. ही गंभीर युद्धे होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये काय चालले होते? तिथे विमाने पाडली जात होती. मला वाटते की, पाच जेट विमाने पाडली गेली. भारत आणि पाकिस्तान हे दोन अणुशक्ती संपन्न देश आहेत. ते एकमेकांवर हल्ला करत होते. त्यामुळे आणखी धोकादायक युद्ध होऊ शकले असते. अलिकडेच इराणमध्ये आम्ही काय केले ते पाहिले असेलच. आम्ही त्यांची अणुशक्ती पूर्णपणे नष्ट केली. उलट, भारत आणि पाकिस्तान लढतच राहिले. पण आम्ही व्यापाराच्या अटींद्वारे हे युद्ध थांबावले.” Jairam Ramesh |
हेही वाचा :





