Sandeep Deshpande : नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, ऐन अधिवेशन काळात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या बंडलचे काही व्हिडीओ एक्सवरून पोस्ट करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी असल्याचा आरोप आहे. या व्हिडीओमुळे राजकारण तापले असतानाच आता मनसेनेही एक व्हिडीओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला असून, पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाच हा व्हिडिओ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळेव ऐन हिवाळी अधिवेशनात ठाकरे बंधूंच्या दोन शिलेदारांनी व्हिडीओ समोर आणले आहेत. यामुळे राजकारण आणखी तापणार असून आरोप प्रत्यारोप होणार असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओला संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम खाते? की फक्त “खाते ” असे म्हणत भष्ट्राचाराचा आरोप केला आहे. योजना राबवायला सरकारकडे पैसे नाहीत … पण योजनेच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर… “पी.डब्ल्यू.डी” मध्ये “महा भ्रष्टाचार”… उद्या चित्रफितीसह पुरावे देणार… सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद… सार्वजनिक बांधकाम फक्त “खाते”… अशी एक पोस्ट त्यांनी फेसबुकवरून काल केली होती. त्यानंतर आज त्यांनी प्रत्रकार परिषद घेत भष्ट्राचार झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आरोप काय? 2 लाख 80 हजार रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जात आहेत. निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदाराकडून पैसे घेतले जातात. आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची. मात्र आता निधी आणण्याचे, वर्क ऑर्डर काढण्याचे आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. इतकेच नाही तर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोलीही लागली जाते, असेही देशपांडे म्हणाले आहेत. हेही वाचा : हातावर लिहिलेलं अक्षर त्या तरुणीचेचं, आरोपींनी दबाव आणला हे खरं; फलटण प्रकरणाची फडणवीसांची सभागृहात महत्त्वाची माहिती