आता उकडलेल्या भाज्या खाण्याची वेळ येणार ? खाद्यतेल अधिकच होणार महाग

नवी दिल्ली – आधी कोरोना आता रशिया – युक्रेनच्या युद्धाचे जागतिक स्थरावर आर्थिक परिणाम जाणवत आहे. सगळीकडे महागाई वाढत आहे. आयात – निर्यात यांच्या किंमती बदलत आहेत. भारतात सुद्धा सध्या महागाई वाढतीये. पूर्वीच महागाईच्या झळा सोसणाऱया भारतीयांवरील भार वाढणार असून याचे कारण इंडोनेशिया हा देश ठरला आहे. इंडोनेशियात 28 एप्रिलपासून पाम तेलाचय निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून ही बंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. भारत मोठय़ा प्रमाणावर पाम तेलाची आयात करत असल्याने इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे भारताच्या अडचणी वाढणार आहेत.
देशात अगोदरच महाग होत चाललेल्या खाद्यतेलाचे दर आणखीन वाढणार आहेत. दरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सद्यकाळात भारत सुमारे 90 लाख टन पाम तेलाची आयात करतो आणि यातील 70 टक्के पाम तेल इंडोनेशियाकडून भारताला पुरविले जाते. तर 30 टक्के पामतेल मलेशियाकडून आयात केले जाते.
खाद्य महागाई वाढणार
– 2020-21 मध्ये भारताने 83.1 लाख टन पाम तेलाची आयात
– भारताला आता मलेशियावरील निर्भरता वाढवावी लागेल
-खाद्य महागाई दर रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे यापूर्वी उच्चांकी स्तरावर





