नोवाक जोकोवीचला विजेतेपद
Updated On:

न्यूयॉर्क –सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने वेस्टर्न व सदन क्लिासिक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्याने अंतिम सामन्यात मिलोस रॉनिकवर पहिला सेट गमावल्यानंतरही सरस खेळ करत 1-6, 6-3, 6-4 असा सहज विजय मिळवला.
या विजयासह जोकोवीचने स्पेनच्या राफेल नदालचा सिरिज टेनिस स्पर्धेतील 35 विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली. या विजयामुळे सोमवारपासून येथे सुरू होत असलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेसाठी त्याची भक्कम तयारी झाली आहे.





