Tokyo Olympics : जोकोविच ऑलिम्पिक खेळणार

टोकियो – सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. त्याचा स्पर्धेतील सहभाग अनिश्चित मानला जात होता.
मात्र, या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकत पुढील अमेरिकन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतही विजेतेपद मिळवले तर त्याचे गोल्डन ग्रॅंडस्लॅम पूर्ण होणार आहे, त्यामुळेच त्याने या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. जोकोविचने नुकतेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे तसेच त्यापूर्वी झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
भारताचा नागलही ठरला पात्र
भारताचा नवोदित टेनिसपटू सुमित नागल आगामी टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरल्याची माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) दिली आहे. त्याचवेळी युकी भांब्री मात्र दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. नागलचे आयटीएफ मानांकन 144 आहे. त्याला ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत थेट प्रवेश दिला आहे.





