Djokovic Prank Video : विम्बल्डनमध्ये नोव्हाक जोकोविचने सामन्यादरम्यान ‘बॉल गर्ल’ची घेतली फिरकी, नेमकं काय केलं? पाहा VIDEO
Djokovic Prank Video : सामन्यादरम्यान;चा नोव्हाक जोकोविचचा एक मजेशीर आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

Wimbledon 2026 Novak Djokovic Prank With Ball Girl Video Viral : तब्बल सात वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणाऱ्या महान नोव्हाक जोकोविचने गुरुवारी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासचा (Stefanos Tsitsipas) थेट सेटमध्ये पराभव केला. या शानदार विजयासह जोकोविचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या (Wimbledon 2026) तिसऱ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यात जोकोविचने सिटसिपासला ६-३, ६-४, ६-२ असे पराभूत केले. सिटसिपाससारख्या बलाढ्य खेळाडूला नमवण्यासाठी जोकोविचला अवघे ९८ मिनिटे लागली, ज्यावरून त्याच्या मैदानावरील वर्चस्वाचा अंदाज येतो. दरम्यान या सामन्यातील जोकोविचचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तो काय आहे? जाणून घेऊया.
मैदानावर ‘बॉल गर्ल’सोबत प्रँक; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल –
There’s a reason they call him the Djoker 😂#Wimbledon | @DjokerNole pic.twitter.com/zLRy1yttve
— Wimbledon (@Wimbledon) July 1, 2026
सामन्यादरम्यानचा नोव्हाक जोकोविचचा एक मजेशीर आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान जोकोविचने तिथल्या एका ‘बॉल गर्ल’ला (खेळपट्टीवर चेंडू पकडणारी मुलगी) त्याच्या शर्टच्या पाठीमागे लागलेला ब्रँड टॅग काढण्यास सांगितले. ती मुलगी जेव्हा कात्रीने तो टॅग कापत होती, त्याच क्षणी जोकोविचने आपल्याला दुखापत झाल्याचे नाटक करत मोठ्याने ओरडला. यामुळे ती बॉल गर्ल काही क्षणांसाठी पूर्णपणे घाबरली आणि थक्क झाली. मात्र, नंतर जोकोविचने हसत वळून आपण फक्त गंमत (Prank) करत असल्याचे सांगताच स्टेडियममध्ये हशा पिकला.
२५ व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाकडे कूच; सिटसिपासविरुद्ध सलग ११ वा विजय –
Deepti Sharma at Wimbledon, talking about the similarities between her Idol MS Dhoni and Novak Djokovic. ❤️@msdhoni #MSDhoni pic.twitter.com/6ar2eDZrXr
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) July 3, 2026
२४ वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारा जोकोविच या वर्षी आपले २५ वे ऐतिहासिक जेतेपद मिळवण्यासाठी कोर्टवर उतरला आहे. पहिल्या फेरीत चार सेटपर्यंत संघर्ष करावा लागल्यानंतर, सिटसिपासविरुद्ध तो पूर्णपणे फॉर्मात दिसला. त्याने अवघ्या २७ मिनिटांत पहिला सेट ६-३ असा जिंकून सामन्यावर पकड मिळवली. जोकोविच आणि सिटसिपास यांच्यातील ही १४ वी लढत होती, ज्यामध्ये जोकोविचने १२ वा विजय मिळवला आहे.
विशेष म्हणजे, सिटसिपासविरुद्ध जोकोविचचा हा सलग ११ वा विजय आहे. सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, “जेव्हा कोर्टवर असा अचूक खेळ होतो, तेव्हा खूप आनंद आणि समाधान मिळते.”





