Ajit Pawar : ‘केवळ तांंत्रिक बिघाडच नाही तर….’; अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक अहवाल समोर
Ajit Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, यामध्ये काही महत्वाचे निरीक्षण नोंदिवण्यात आले आहे.

Ajit Pawar : २८ जानेवारीला अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांंच्यासोबत असलेल्या पाच जणांना देखील आपले प्राण गमावावे लागले. यानंतर या घटनेची दखल केंद्र आणि राज्याने देखील घेत चौकशीचे आदेश दिले होते. आता या विमान अपघाताचा प्राथमिक निरीक्षण अहवाल समोर आला असून, यामध्ये महत्वाचे निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.
या दुर्देवी घटनेला आज ९ दिवस पूर्ण झाले असून, अजूनही महाराष्ट्र या धक्क्यातून सावरत आहे. जो अहवाल विमान अपघाताबाबत समोर आला आहे, त्यामध्ये अपघाताबाबत खुलासा करण्यात आला आहे. ‘अजितदादांचा विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे नाही, तर लँडिंगचा अँगलच चुकला’ अशी धक्कादायक माहिती प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. तसेच अपघाताला मानवी चुकाही कारणीभूत होत्या, असे महत्वाचे निरीक्षण देखील प्राथमिक चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
कोणती निरीक्षण नोंदविण्यात आली आहेत?
विमान उतरण्याच्या क्षणी त्यांच्या नियंत्रण प्रणालीमध्ये किंवा इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला असावा. परिणामी पायलटचे विमानावरचे नियंत्रण सुटले.
विमान लँडिंग करत असताना पायलटचा लँडिंगचा अँगलच चुकला.
प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक समस्यांमुळे पायलटला धावपट्टीची योग्य दिशा आणि उंची राखण्यात अडचण आली होती.
धावपट्टीचा अंदाज घेण्यात झालेली ही चूक विमानाची गती आणि इंधन स्थिती लक्षात घेता जीवघेणी ठरली.
अशी महत्वाची निरीक्षणे प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आली असून, विमान अपघाताबाबतचा सविस्तर चौकशी अहवाल समोर आल्यानंतर याबाबत आणखी स्पष्टता येईल.
हेही वाचा : Anushka Sharma: आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्माचा आनंद; “इतिहास पुन्हा घडला”






