Anushka Sharma: आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का शर्माचा आनंद; “इतिहास पुन्हा घडला”
Anushka Sharma: काल रात्री वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 चा अंतिम सामना झाला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलची ट्रॉफी जिंकली.

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली आरसीबी महिला संघाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयावर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही आनंद व्यक्त केला आहे. अनुष्का ही आरसीबीच्या पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी आहे.
अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आरसीबी महिला संघ ट्रॉफी उंचावत असलेला फोटो शेअर केला. त्या फोटोसोबत तिने लिहिले, “आरसीबी महिला संघाने पुन्हा कमाल केली. इतिहास पुन्हा घडला.”
डब्ल्यूपीएलच्या चार वर्षांच्या इतिहासात आरसीबीने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. याआधी 2024 मध्येही स्मृती मंधानाच्या कप्तानीत आरसीबीने ट्रॉफी जिंकली होती. आता 2026 मध्येही स्मृतीच्या नेतृत्वाखाली संघाने ही कामगिरी पुन्हा केली आहे.

WPL 2026 Final
दरम्यान, अनुष्का शर्मा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. ती शेवटची 2018 मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. ‘चकदा एक्सप्रेस’ हा तिचा आगामी चित्रपट झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित असून, त्याची शूटिंग पूर्ण झाली असली तरी तो अजून रिलीज झालेला नाही. सध्या अनुष्का तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.