मुख्यमंत्री म्हणून नाही तर राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी जनतेची काळजी घेतली – सचिन अहिर

Updated On:
मुख्यमंत्री म्हणून नाही तर राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी जनतेची काळजी घेतली – सचिन अहिर

हडपसर – कोरोना महामारीच्या या दोन वर्षांच्या काळात मुख्यमंत्री म्हणून नाही तर उद्धव ठाकरेंनी राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्यातील जनतेची काळजी घेतली. मागील दोन वर्षांचा काळ सर्वांसाठीच कठीण होता, अशातही त्यांनी एक वडील म्हणून जनतेची काळजी घेतली. आज महाराष्ट्र नव्हे तर देशही त्यांच्या कामाचं कौतुक करतोय.त् यांचं काम इतिहासात नोंदवलं जाईल, अशा शब्दांत शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

काळेपडळ येथे जीएसपीएम कॉलेजच्या मागील बाजूस नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी स्वखर्चाने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक सुशोभीकरण तसेच धर्मवीर आनंद दिघे वाचनालय यांचे उद्घाटन व महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते सचिन अहिर बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे,जिल्हा प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, नगरसेवक विशाल धनवडे,माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, सोमनाथ करे, उद्योजक बाळासाहेब तात्या भानगिरे,माजी नगरसेवक तानाजी लोणकर, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर,हवेली पंचायत समिती सदस्य राजू भाडळे, गणेश शिंदे, सरपंच प्रज्ञा झाबरे, कांचन भानगिरे, अभिमन्यू भानगिरे , माऊली भानगिरे, राजेंद्र भानगिरे ,उल्हास तुपे ,इंतुभाई शेख,देवेंद्र भाट,नितीन गावडे, शाश्वत घुले,वैष्णवी घुले,वैशाली काळे, शिवसेनेचे शहर व हडपसर विधानसभा पदाधिकारी, शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला ,सोसायट्यांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.दरम्यान अयोध्या बबन आंधळे यांनी शेकडो महिलासमवेत शिवसेनेत प्रवेश केला.

सचिन अहिर पुढे म्हणाले की, केवळ एक दिवस नाही,तर दररोज महिला दिनाचे महत्त्व असायला पाहिजे.या २१ व्या शतकात महिला सर्वांना बरोबर किंबहुना त्याहून अधिक सक्षमपणे आणि मोठया पदावर कार्यरत आहेत. कोरोना काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी चांगले योगदान दिले आहे. हे विसरता येणार नाही. या महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला मार्केटही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

शिवसेनेनं आजवर ज्यांना पदे दिली, शिवसेनेचा वापर करून मोठे झाले ते आता शिवसेनेच्या वरिष्ठांना डावलत आहेत नगरसेवक भानगिरे यांच्या या तक्रारीचा धागा पकडून बोलताना अहिर म्हणाले की शिवसेनेमुळे जे मोठे झालेत ते जर आता शिवसेनेला बाजूला करून काही वेगळे करत असतील, तर त्यांना त्याचे योग्य वेळी परिणाम भोगावे लागतील.नाना भानगिरे यांनी केलेल्या कामांचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान महिला दिनाच्या निमित्ताने डॉक्टर, नर्स, महिला पोलीस कर्मचारी, शिक्षिका, अंगणवाडी सेविका यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने चौकाचे सुशोभीकरण केल्याने धनगर समाज बांधवांनी नगरसेवक भानगिरे यांचे आभार व्यक्त केले .त्याचवेळी भविष्यात येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्याचा मानस भानगिरे यांनी व्यक्त केला. सचिन तरवडे यांनी आभार मानले.

प्रभाग रचना बदलली तरी विकास कामे व जनसंपर्क सुरूच राहणार – नाना भानगिरे
भविष्यात प्रभाग रचना जरी बदली ,तरी या नवीन समाविष्ट गावांतील मी करत असलेली विकास कामे सुरूच राहणार आहेत. येथे मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा,कचरा व्यवस्थापन सुरळीत राहणार ही गावे माझ्या प्रभागात येतील किंवा नाही येतील पण शिवसेना पक्षाने या दत्तक गावची दिलेली जबाबदारी मी पूर्णपणे सांभाळून या प्रत्येक गावात सुमारे ३कोटी एवढा निधी उपलब्ध करून घेऊन पुढील विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.अशी ग्वाही यावेळी नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिली. आजवर पूर्व भागात म्हणजे हडपसरवर सर्व पक्ष्यांच्या महापालिका सत्ताधारी यांनी अन्याय केला. अपेक्षित असा विकास महापालिकेत सत्ता असतानाही या पक्षांना करता आला नाही. शिवसेनेला एकदा सत्ता देऊन पहावी, विकास नेमका काय असतो तो करून दाखविल्या शिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे जनतेने आता एक व्हिजन घेऊन असलेल्या शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहनही नगरसेवक नाना भानगिरे यांनी यावेळी केले.

…..तर हडपसरला महापालिकेत महत्वाचे पद देवू
नगरसेवक नाना भानगिरे यांनी या भागातून दहा ते बारा नगरसेवक विजयी होतील,असा विश्वास दिला आहे. इतर सर्व पदाधिकारीही तेवढ्याच ताकदीने काम करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हडपसर शिवसेनेने चांगले काम केले आहे. हडपसरची ही साथ अशीच राहिली, तर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यावेळी हडपसरमध्ये महत्त्वाचे पद दिले जाईल , असे आश्वासन यावेळी सचिन अहिर यांनी दिले.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : पोलीस मित्र संघटनेतर्फे पालख्यांचे स्वागत

2026-07-09 21:29:40

Pune News : पोलीस मित्र संघटनेतर्फे पालख्यांचे स्वागत

Khadakwasala Dam : खडकवासला धरणाचा विसर्ग बंद; चारही धरणांमध्ये 16.17 टीएमसी पाणीसाठा

2026-07-09 18:00:22

Khadakwasala Dam : खडकवासला धरणाचा विसर्ग बंद; चारही धरणांमध्ये 16.17 टीएमसी पाणीसाठा

Pune News : रक्षकच बनले भक्षक ! पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खंडाळा हायवे पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश

2026-07-09 16:48:22

Pune News : रक्षकच बनले भक्षक ! पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खंडाळा हायवे पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश

Pune : पु. ना. गाडगीळ अँड सन्सच्या 'रेवा डायमंड्स'चे तिसरे एक्सक्लुझिव्ह शोरूम हडपसरमध्ये सुरू

2026-07-09 11:34:30

Pune : पु. ना. गाडगीळ अँड सन्सच्या 'रेवा डायमंड्स'चे तिसरे एक्सक्लुझिव्ह शोरूम हडपसरमध्ये सुरू

Pune News : पंढरीच्या वारकऱ्यांसाठी 'डॉ दुधभाते नेत्रालय आणि आर टी ओ पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर

2026-07-08 17:04:30

Pune News : पंढरीच्या वारकऱ्यांसाठी 'डॉ दुधभाते नेत्रालय आणि आर टी ओ पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर