Ajit Pawar : घड्याळ नाही तर ‘या’ गोष्टीवरून ओळख पटली; विमान अपघातप्रकरणी पोलीस तपासात मोठी माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची ओळख घड्याळावरून पटली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar : अजित पवार यांचा विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची ओळख त्यांच्या हातावरील घड्याळावरून पटली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिस तपासात नेमकी त्यांची ओळख कशावरून पटली. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळामुळे पटली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण अजित पवारांची ओळख त्यांच्या हातावरील कुर्त्याच्या कापड्यामुळे पटल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या उजव्या हातावरील कुर्त्याच्या (शर्टच्या) कापडामुळे त्यांची प्रथम दर्शनी ओळख पटली. प्रत्यक्षात त्यांच्या डाव्या हातावर जे घड्याळासारखे दिसत होते, तो त्यांच्या शर्टचाच एक भाग होता, अशी मोठी माहिती समोर आली आहे. कापडावरून झालेली ही ओळख प्राथमिक होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि पूर्णपणे खात्री पटवण्यासाठी प्रशासनाकडून DNA चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची ओळख पटवण्यात आली.
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
२८ जानेवारी या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांसोबत विमानातील पाच जणांचा देखील दुर्देवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हळहळला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राजकारणात देखील अनपेक्षित अशा घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीसाठी सीआयडीला आदेश दिले आहेत. याबरोबरच विमान अपघाताचा तपास अन्वेषण विभाग (Aircraft Accident Investigation Bureau – AAIB) मार्फत केला जात आहे.
नेमका अपघात कशामुळे?
ब्लॅक बॉक्स (फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर) हाती घेण्यात आला असून, प्राथमिक अहवाल ४५ दिवसांत येण्याची शक्यता आहे. अपघाताचे मुख्य कारण लँडिंगदरम्यान कमी दृश्यमानता असून, त्याचबरोबर तांत्रिक बिघाड असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच विमान अपघाताचे नेमके कारण काय होते याची माहिती समोर येईल.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : “लाडकी बहिण योजनेला अजितदादांचे नाव द्या”; अमोल मिटकरींची मागणी







