Ladki Bahin Yojana : “लाडकी बहिण योजनेला अजितदादांचे नाव द्या”; अमोल मिटकरींची मागणी
Ladki Bahin Yojana : दुसरीकडे, कात्रज दूध संघाला 'अजितदादा पवार' नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Ladki Bahin Yojana : राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लोकप्रिय आहे. अनेक पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठी मागणी केली आहे.
अजितदादांच्या दुरदृष्टीतून आलेल्या या योजनेला ‘अजितदादांची लाडकी बहिण योजना’ असं नाव देऊन त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्या, अशी विनंती मिटकरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना केली आहे. Ladki Bahin Yojana
कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा निर्णय
दुसरीकडे, कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा निर्णय काल बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाला ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे नामकरण करण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे.
31 जानेवारी रोजी चेअरमन अॅड. स्वप्नील ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा ठराव मांडण्यात आला. उपस्थित सर्व संचालकांनी या निर्णयाला एकमतानं मंजुरी दिली. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेला देखील अजितदादांचे नाव देण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे. Ladki Bahin Yojana
लाडकी बहिण योजना कायमच वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. निधीच्या कमतरतेमुळे, ई-केवायसी आणि नाव कपातीच्या तांत्रिक मुद्द्यांवरून विरोधकांनी रान उठवले होते.
अर्थखात्याने महसुली तूट वाढल्याचे पत्रक काढले होते, मात्र अजित पवारांनी खंबीर भूमिका घेत ‘लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही’ असा शब्द दिला होता.
2100 रुपये देणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन
तर अलिकडेच राज्यातील लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबणार नाही. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ विनंती करायला आला आहे. तसेच लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. Ladki Bahin Yojana
हेही वाचा :
Jay Pawar on Ajit Pawar : ‘डॅड… काश वेळ थांबली असती’; जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावुक पोस्ट






