35 नव्हे, तर 33 टक्क्यांवर पास! दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘या’ राज्याचा मोठा निर्णय

Government of Karnataka : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा अत्यंत महत्वाची असते. या परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यी पात्र ठरतात. तर काही विद्यार्थ्यी या परीक्षेत अनुउत्तीर्णही होतात. दहावी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३५ टक्के गुण असणे अनिवार्य असते. पण आता या गुणांची मर्यादी कमी करण्यात आली आहे. ३५ टक्के नव्हे तर ३३ टक्के गुण मिळाले तरीही विद्यार्थ्यी उत्तीर्ण होणार आहे, हा महत्वपूर्ण निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.
यंदा २०२५-२६ पासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुण असणे आवश्यक असणार आहे. कर्नाटक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री एस. मधू बंगारप्पा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांसाठी ३५ टक्के नाही तर ३३ टक्के गुण विद्यार्थ्यांना मिळवावे लागणार आहेत. या निर्णयानंतर आता महाराष्ट्रात असा निर्णय घेतला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रेस मार्क कमी होणार
कर्नाटक सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात ३० गुण आणि सरासरी ३३ गुणे मिळवावे लागणार आहेत. एकूण ६०० पैकी १९८ गुणे मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम नवीन विद्यार्थी, रिपीटर तसेच खाजगी उमेदवारांनाही लागू असणार आहे. या नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांची पास होण्याची ३५ टक्क्यांची मर्यादा ही ३३ टक्क्यांवर करण्यात आली असली तरी मिळणारे ग्रेस मार्क दिले जाणार नसल्याचे कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळला आहे. या नव्या निर्णयाची अंमलबाजवणी कशी केली जाते हे पाहणे लागणार आहे. यासाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि राष्ट्रीय निकषांमध्ये सुसंगतपणा राखवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.





