उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांनी दाखवली ‘सुसाइड ड्रोन’ची ताकद, वाचा त्याची खासियत…

प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी अखेर ‘सुसाइड ड्रोन’चे अनावरण केले आहे. उत्तर कोरियाने त्याची यशस्वी चाचणीही केली आहे. दक्षिण कोरियाच्या मीडिया रिपोर्टनुसार, 24 ऑगस्ट रोजी याची चाचणी घेण्यात आली. किम जोंग यांनी स्वतः याची देखरेख केली होती. यावेळी किम यांनी आणखी ‘सुसाइड ड्रोन’ बनवण्यास सांगितले आहे.
.jpg)
ड्रोन इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायन्सेसने याची चाचणी केली आहे. यावेळी किम जोंग यांनी आपल्या शास्त्रज्ञांना या ड्रोनसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याचे आवाहन केले.
एजन्सी योनहॅपने ‘सुसाइड ड्रोन’ची छायाचित्रे जारी केली आहेत. चित्रांमध्ये ड्रोन रणगाड्यासारखे दिसणाऱ्या लक्ष्यावर हल्ला करताना दिसत आहे. उत्तर कोरियाने प्रथमच अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे अनावरण केले आहे.

वैशिष्ट्य काय आहे ?
या ड्रोनमध्ये जमीन, हवाई आणि समुद्रातील शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता आहे. सुसाइड ड्रोनला लोइटरिंग म्युनिशन असेही म्हणतात. युक्रेन युद्धात याचा वापर केला गेला आहे. साधारणपणे, जेव्हा ड्रोन एखाद्या ठिकाणी पोहोचतो आणि क्षेपणास्त्र किंवा इतर पेलोडवर हल्ला करतो, तेव्हा हे ड्रोन लक्ष्य गाठल्यानंतर त्याच्यावर आदळते आणि स्फोट होतो.
.jpg)
चीन, रशिया आणि उत्तर कोरियामध्ये युद्ध होणार?
अलीकडेच, न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे की अध्यक्ष जो बायडेन यांनी एका दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये अमेरिकेच्या लष्कराला रशिया, चीन आणि उत्तर कोरियासोबत संभाव्य आण्विक युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले होते.




