Kim Jong Un : किम जोंग उन चीनच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांना जोडणाऱ्या पुलाचे करणार उद्घाटन
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (Kim Jong Un) आज चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले. उत्तर कोरिया आणि चीनला जोडणाऱ्या पुलाचे ते उद्घाटन करणार आहेत.

Kim Jong Un : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (Kim Jong Un) आज चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले. उत्तर कोरिया आणि चीनला जोडणाऱ्या पुलाचे ते उद्घाटन करणार आहेत. याशिवाय चीन आणि उत्त कोरियादरम्यानच्या संबंधांना अधिक बळकटी मिळवून देण्याचा प्रयत्नही ते करणार आहेत.
अमेरिकेच्या वाढत्या प्रभावामुळे नव्याने शीत युद्ध सुरू झाले असल्याचे किम म्हणाले होते. आता हाच अमेरिकेचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी उत्तर कोरियाकडून रशिया आणि चीनशी जवळीक वाढवली जाते आहे.
नव्याने खुला झालेला पूल ओलांडून किम शनिवारी चीनच्या दांडोंग या सीमावर्ती शहरात दाखल झाले. त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य वांग हुनिंग यांची भेट घेतली. दोघांनी एका कारखान्याला भेट दिली आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची ग्वाही दिली.
आपला देश चीनसोबतची ऐतिहासिक मैत्री पुढे नेण्यासाठी आणि व्यावहारिक सहकार्य वाढवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या लोकांना मूर्त लाभ मिळतील, असे किम म्हणाले. त्यानंतर वांग हे किम (Kim Jong Un) यांना नव्याने बांधलेल्या पुलापर्यंत सोडायला गेले. तेथून किम उत्तर कोरियाला परतले, असे दक्षिण कोरियाच्या उत्तर कोरियाविषयक व्यवहार पाहणाऱ्या एकीकरण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
किम यांनी अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या युक्रेनमधील युद्धाला पाठिंबा देण्यासाठी हजारो सैनिक आणि पारंपरिक शस्त्रे पाठवली आहेत. अनेक वर्षे रशियासोबतच्या संबंधांना प्राधान्य दिल्यानंतर, किम यांनी अलीकडे उत्तर कोरियाचा जूना मित्र असलेल्या चीनसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. २०११ च्या अखेरीस सत्तेवर आल्यापासून किम यांचा हा चीनचा सहावा दौरा आहे.
यालू नदीवरील नवीन पूल
या महिन्यात यालू नदीवरील नवीन पुलाचे उद्घाटन हे उत्तर कोरिया आणि चीन यांच्यातील संबंध दृढ होण्याचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. त्यातून व्यापार वाढवण्याचा त्यांचा इरादाही दिसून आला, कारण या पुलावरून (Kim Jong Un) कंटेनर आणि अवजड मालवाहू ट्रकसह चोवीस तास दुतर्फा वाहतूक सुरू राहण्याची अपेक्षा आहे.






