North Korea : उत्तर कोरियाने घेतली क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी; किम जोंग उन यांनी केले परीक्षण
उत्तर कोरियाने (North Korea) आपल्या कांग कोन या नवीन विनाशिकेवरून अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी नेहमीप्रमाणे या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे प्रत्यक्ष परीक्षण केले.

North Korea : उत्तर कोरियाने (North Korea) आपल्या कांग कोन या नवीन विनाशिकेवरून अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी नेहमीप्रमाणे या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे प्रत्यक्ष परीक्षण केले. कांग कोन ही उत्तर कोरियाची सर्वात प्रगत विनाशिका गेल्या वर्षी देशाच्या नौदलामध्ये सामील करण्यात आली होती.
मात्र उद्घाटनाच्या समारंभाच्यावेळीच ही विनाशिका समुद्रात कलंडली होती. त्यानंतर या युद्धनौकेची डागडुजी करून आता ती कार्यान्वित करण्यात आली आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये एका क्रूझ क्षेपणास्त्राची (North Korea) आणि कांग कोनच्या मुख्य तोफेची व स्वयंचलित तोफांची चाचण्या घेण्यात आल्या.
तसेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, टार्गेट डिटेक्शन आणि इन्फोर्मेशन प्रोसेसिंग क्षमतांची चाचणीही घेण्यात आली किनाऱ्यावरून चाचण्यांचे निरीक्षण केल्यानंतर, किम यांनी अधिकाऱ्यांना विनाशिकेच्या चाचण्या पूर्ण करून दोन महिन्यांच्या (North Korea) आत जहाजाला सक्रिय सेवेत दाखल करण्याचे आदेश दिले.
उत्तर कोरियाकडून नौदल क्षमता वाढवण्यावर भर
महिन्याभरापुर्वीच उत्तर कोरियाने चोए ह्योन या ५ हजार टन वजनाची विनाशिका नौदलामध्ये सामील केली आहे. किम यांच्या महत्वाकांक्षेप्रमाणे ही विनाशिका देखील अण्वस्त्रसज्ज करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विकसावर लक्ष केंद्रित करणाऱ्या किम यांनी आता नौदलाची क्षमता वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
उत्तर कोरिया (North Korea) आता अणू इंधनावर चालणारी पाणबुडी देखील विसित करत आहे. सत्तारुढ वर्कर्स पार्टीच्या पंचवार्षिक अधिवेशनामध्ये बोलताना किम यांनी पाण्याखालून मारा करू शकणाऱ्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याची योजनाही जाहीर केली आहे.






