Korean Conflict : उत्तर कोरियाने पुन्हा पाठवले घाणीचे शेकडो बलून, दक्षिण कोरियाकडून तीव्र निषेध….

सेऊल : उत्तर कोरियाने आज पुन्हा एकदा दक्षिण कोरियावर घाणीने भरलेले शेकडो बलून पाठवले. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने असे शेकडो बलून दक्षिण कोरियावर पाठवले होते. दक्षिण कोरियाकडून सीमाभागात उत्तर कोरियाविरोधात प्रचार करणारी पत्रके टाकल्याची प्रतिक्रीया म्हणून हे बलून पाठवल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.
शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत उत्तर कोरियाकडून सुमारे 600बलून दक्षिण कोरियाच्या अवकाशात आले होते. (North Korea sends 600 balloons carrying rubbish into South Korea) या बूनमध्ये सिगारेटची थोटके, कपड्यांचे तुकडे, कागदाचे तुकडे, पुस्तक बंधणीसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक आदी कचरा होता. या व्यतिरिक्त अन्य कोणताही घातक पदार्थ या बलूनमध्ये नव्हता, असे दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफनी सांगितले.
या बलूनमधून पडणाऱ्या वस्तूंपासून सावध राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. असे बलून आढळल्यास त्याची माहीती पोलीस किंवा लष्कराला देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उत्तर कोरियाकडून येणारे असे बलून फोडण्याचे काम दक्षिण कोरिया करत असून नागरिकांनी सावध रहावे, असे संदेश लोकांना मोबाईलवर पाठवले गेले आहेत.
Peshawar : पाकिस्तानी लष्कराने 5 महिन्यांत केला 504 दहशतवाद्यांचा खात्मा..
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचे प्रक्षेपण अपयशी झाल्यापासून असे बलून पाठवले जाऊ लागले आहेत. तसेच दक्षिण कोरियाच्या दिशेने लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रेही डागली जाऊ लागली आहेत. दक्षिण कोरियाला आपली लष्करी क्षमता दाखवून देण्यासाठी ही रॉकेट सोडली जात असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.





