नोरा फतेहीचे हळदीचे फोटो व्हायरल; कोरियन अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ? काय आहे सत्य…

Nora Fatehi | बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फतेही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे नोराचे कोरियन अभिनेत्यासोबतचे हळदीचे फोटो व्हायरल झाले आहे. यामध्ये ती कोरियन अभिनेता मिन होसोबत पोझ देताना दिसत आहे.
दोघांनीही पिवळ्या रंगाची कपडे परिधान केल्याचं दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये दोघांच्याही अंगाला हळद लागल्याचं दिसत आहे. ‘नोरा-मिन हो हळद कार्यक्रम…’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. Nora Fatehi |
View this post on Instagram
‘तुझं लग्न होणार आहे का?’, ‘हे शूटिंग आहे की रियल?’, ‘हे फोटो Ai चे आहेत का?’, असा सवाल चाहत्यांनी केला आहे. तर काहींनी आयकॉनिक जोडी म्हणून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. Nora Fatehi |
दरम्यान, नोरा फतेहीचे हे फोटो बनावट आहेत. त्यांच्या टीमकडून किंवा सोशल मीडियावर त्यांनी अशी कोणतीही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली नाही. नुकतीच नोरा न्यूयॉर्क शहरात एका शानदार दिवाळी पार्टीदरम्यान दिसली होती.
हेही वाचा :
‘आयर्न लेड’ साने ताकाची बनल्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान ; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन





