\n

या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. घर देताना व्यक्तीची जात, धर्म किंवा आहाराची पद्धत पाहणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विशेष म्हणजे, हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता आता राजकीय पातळीवरही पोहोचला आहे.

\n

मनसेचा आक्रमक इशारा :

\n

या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी संबंधित व्यक्तीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने या व्यक्तीचा समाचार घेतला जाईल,” असा इशारा दिला आहे. मात्र, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घर देण्याच्या नियमांवरून सुरू झालेल्या वादाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे.

\n

किशोरी पेडणेकरांचाही संताप :

\n

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही या जाहिरातीवर संताप व्यक्त केला. त्यांनी संबंधित व्यक्तीवर टीका करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.

\n

दरम्यान, मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनीही या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या आहाराच्या सवयीवरून तिला गृहनिर्माण सोसायटी किंवा इमारतीमध्ये सदनिका द्यायची किंवा नाही, असा राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिकेचा कोणताही कायदा नाही, असं त्यांनी सांगितलं.

\n

त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर नियम काय आहेत आणि संबंधित घरमालकाला आपल्या मालमत्तेसाठी अशा अटी घालण्याचा अधिकार कितपत आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

\n

मालक वारकरी असून त्यांची अशी इच्छा होती…

\n

दरम्यान, हा वाद वाढल्यानंतर स्वतः भावेश यांनी आणखी व्हिडिओ शेअर करत संपूर्ण घटनेबद्दल माफी मागतील आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत मांसाहार करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी शुद्ध शाकाहारी लोकही आहेत. मांसाहार न करणाऱ्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा व्हिडीओ तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

\n

ज्या मालमत्तेचा व्हिडीओ त्यांनी बनवला, त्या घराच्या मालकाची शाकाहारी जीवनशैली असल्याचे कावरे यांनी स्पष्ट केले. मालक वारकरी असून त्यांची अशी इच्छा असल्याने शाकाहाराचा मुद्दा व्हिडीओमध्ये मांडल्याचा दावा त्यांनी केला.

\n

सी-व्ह्यू असलेल्या घराची जाहिरात करताना ‘चिकन पिझ्झा खाताना सी-व्ह्यू पाहायचा असेल तर इथे घर घेऊ शकता’, अशा पद्धतीने जाहिरात करण्याचाही उल्लेख त्यांनी केला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Bhavesh Kaware Video : मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही.! इस्टेट एजंट भावेश कावरेच्या व्हिडीओने सुरु झाला नवा वाद, मनसेचा आक्रमक इशारा…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-13T195509.176.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/non-vegetarians-wont-get-homes-in-mumbai-a-new-controversy-has-erupted-following-a-video-by-estate-agent-bhavesh-kavre-maharashtra#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-13T195509.176.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/non-vegetarians-wont-get-homes-in-mumbai-a-new-controversy-has-erupted-following-a-video-by-estate-agent-bhavesh-kavre-maharashtra#webpage","name":"Bhavesh Kaware Video : मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही.! इस्टेट एजंट भावेश कावरेच्या व्हिडीओने सुरु झाला नवा वाद, मनसेचा आक्रमक इशारा…","url":"https://www.dainikprabhat.com/non-vegetarians-wont-get-homes-in-mumbai-a-new-controversy-has-erupted-following-a-video-by-estate-agent-bhavesh-kavre-maharashtra","inLanguage":"mr","description":"‘प्युअर व्हेजिटेरियन असाल तर कॉल करा..’, असं आवाहन केलं. त्याचवेळी मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना या घरासाठी संपर्क करू नका, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/non-vegetarians-wont-get-homes-in-mumbai-a-new-controversy-has-erupted-following-a-video-by-estate-agent-bhavesh-kavre-maharashtra#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-13T195509.176.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/non-vegetarians-wont-get-homes-in-mumbai-a-new-controversy-has-erupted-following-a-video-by-estate-agent-bhavesh-kavre-maharashtra#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/non-vegetarians-wont-get-homes-in-mumbai-a-new-controversy-has-erupted-following-a-video-by-estate-agent-bhavesh-kavre-maharashtra","name":"Bhavesh Kaware Video : मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही.! इस्टेट एजंट भावेश कावरेच्या व्हिडीओने सुरु झाला नवा वाद, मनसेचा आक्रमक इशारा…"}}]}}}

Bhavesh Kaware Video : मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही.! इस्टेट एजंट भावेश कावरेच्या व्हिडीओने सुरु झाला नवा वाद, मनसेचा आक्रमक इशारा…

Bhavesh Kaware Video : मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही.! इस्टेट एजंट भावेश कावरेच्या व्हिडीओने सुरु झाला नवा वाद, मनसेचा आक्रमक इशारा… - Dainik Prabhat