Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDA चा डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका.! चार शाखांचे परवाने निलंबित
मोहिमेदरम्यान दोन आस्थापनांचे कामकाज त्वरित थांबवण्यात आले, तसेच 95 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत आणि पाच अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

Tukaram Mundhe – एफडीएने डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका दिला आहे. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर डोमिनोज पिझ्झाच्या चार शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध या अभियानाअंतर्गत एफडीएकडून राज्यातील 104 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2 व्यावसाय तात्काळ बंद करण्यात आले. तर 5 परवाने निलंबित तर 95 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या.
अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर राबवलेल्या मोहिमेचा भाग म्हणून अनेक ठिकाणी या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये एफडीएने डोमिनोज पिझ्झा, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉन्जिनीजसारख्या ब्रँड्सच्या एकूण 104 आस्थापनांची तपासणी केली.
या मोहिमेदरम्यान दोन आस्थापनांचे कामकाज त्वरित थांबवण्यात आले, तसेच 95 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत आणि पाच अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.
दरम्यान, बोरीवली पश्चिम येथील डोमिनोज पिझ्झाच्या एका शाखेमध्येही नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. अन्न साठवणूक, तापमान, अन्नाची तपासणी, स्वच्छता यासह आदी त्रुटी एफडीएने निदर्शनास आणून दिल्या.
तसेच घाटकोपर पश्चिम येथील एका मॉलमधील डोमिनोजच्या एका शाखेचा परवानाही निलंबित केला. सातारा जिल्ह्यातील देखील डोमिनोजच्या एका शाखेचा परवाना निलंबित केला आहे.






