नोएडात लिफ्ट पडल्याने ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

नोएडा – उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. नोएडा सेक्टर 137 येथील एका सोसायटीत झालेल्या अपघातात एका 70 वर्षीय महिलेचा लिफ्टच्या मध्यभागी पडून मृत्यू झाला. ही घटना पारस टायरा सोसायटीत गुरुवारी घडली.
पोलिसांनी सांगितले की, वायर तुटली आणि लिफ्ट खाली पडली तेव्हा 70 वर्षीय सुशीला देवी लिफ्टमध्ये होत्या. त्यांना तातडीने फेलिक्स रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचे मुख्य कारण स्पष्ट होईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायर तुटल्याने लिफ्ट खाली पडली. लिफ्टमध्ये एक महिला अडकली होती जी लिफ्ट पडल्याने बेशुद्ध झाली होती. या महिलेस जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेची माहिती सायंकाळी सातच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.





