Noel Tata : टाटा ट्रस्टचे प्रबळ दावेदार ‘नोएल टाटा’ नेमके कोण? एकूण संपत्ती किती? त्यांचीच निवड का केली, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा…

Noel Tata । Ratan Tata : रतन टाटा यांच्या उत्तराधिकाऱ्याची टाटा समूहाकडून निवड करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी दोनदा लग्न केले होते. नवल टाटा यांचे दुसरे लग्न सिमोन टाटा यांच्याशी झाले होते. नोएल टाटा हे नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत.
नोएल टाटा हे अनेक कंपन्यांचे प्रमुख आहेत. ते सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे बोर्ड ट्रस्टी देखील आहेत. ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रमुख देखील आहेत. ते गेल्या 40 वर्षांपासून टाटा समूहाशी संबंधित आहेत.
प्रबळ दावेदार :
रतन टाटा यांनी त्यांचा उत्तराधिकारी नियुक्त केला नव्हता, अशा परिस्थितीत त्यांच्या ट्रस्टच्या विश्वस्तांमधून अध्यक्ष निवडणे आवश्यक होते. टाटा समूहाचे दोन मुख्य ट्रस्ट आहेत – सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट. हे दोन ट्रस्ट टाटा समूहाची मूळ कंपनी टाटा सन्समध्ये संयुक्तपणे 52 टक्के भागीदारी करतात. हा समूह विमान वाहतूक ते एफएमसीसीपर्यंतचे उद्योग हाताळतो.
दोन्ही ट्रस्टमध्ये एकूण 13 विश्वस्त आहेत. हे लोक दोन्ही ट्रस्टचे विश्वस्त आहेत. यामध्ये माजी संरक्षण सचिव विजय सिंह, ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज वेणू श्रीनिवासन, रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, उद्योगपती मेहली मिस्त्री आणि वकील दारियस खंबाटा यांच्या नावांचा समावेश आहे.
टाटा ट्रस्टचा कारभार फक्त पारसी लोकांनीच आतापर्यंत सांभाळला आहे, हेही एक ऐतिहासिक सत्य आहे. तथापि, यातील काही जण टाटा नाहीत आणि ट्रस्टच्या संस्थापक कुटुंबाशी त्यांचा थेट संबंध नव्हता. जर नोएल टाटा या ट्रस्टचे प्रमुख म्हणून निवडले गेले तर ते सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ११ वे अध्यक्ष आणि सर रतन टाटा ट्रस्टचे सहावे अध्यक्ष होतील.
मुलांना महत्त्वाची जागा मिळाली :
या वर्षाच्या सुरुवातीला टाटा समूहाने नोएल टाटा यांच्या तीन मुलांना त्यांच्या पाच धर्मादाय संस्थांचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. नोएल टाटा यांच्या मुलांची नावे लीआ, माया आणि नेव्हिल अशी आहेत.
या तिघांना सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या पाच ट्रस्टचे विश्वस्त बनवण्यात आले आहे. या सर्व पदांवर नियुक्तीला रतन टाटा यांनी हिरवा कंदील दिला होता. या तिघांनी टाटा समूहात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
जन्म आणि शिक्षण :
नोएल टाटा यांचा जन्म 1957 मध्ये नवल टाटा आणि सिमोन टाटा यांच्या पोटी झाला. यूकेमधील ससेक्स विद्यापीठातून बॅचलरची पदवी मिळवली आहे. नंतर फ्रान्समधील जगातील शीर्ष व्यावसायिक शाळांपैकी एक असलेल्या INSEAD मधील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रमात भाग घेतला होता.
टाटा ग्रुपमधील टाटा इंटरनॅशनलमध्ये त्यांनी व्यावसायिक प्रवास सुरू केला. ही कंपनी टाटांचा विदेशातील व्यवसाय पाहते. जून 1999 मध्ये त्यांना टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंटचे एमडी बनवण्यात आले. ही कंपनी त्यांची आई सिमोन टाटा यांनी स्थापन केली होती.
नोएल टाटा यांची एकूण संपत्ती किती?
नोएल आणि आलू यांना तीन मुले आहेत – माया, नेव्हिल आणि लेआ. नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा 2016 मध्ये ट्रेंटमध्ये रुजू झाला आणि अलीकडेच स्टार बाजारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये नोएल टाटा यांच्या मुलींचाही सहभाग आहे.
लेह टाटा, 39, यांना अलीकडेच इंडियन हॉटेल्सच्या गेटवे ब्रँडची जबाबदारी देण्यात आली होती. 36 वर्षीय माया टाटा यांना विश्लेषण आणि तंत्रज्ञानामध्ये रस आहे. ती टाटा डिजिटलमध्ये काम करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोएल टाटा यांची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 12,455 कोटी रुपये आहे.





