Tukaram Mundhe : आता थांबायचं नाय! रात्रीच्या वेळी अचानक धाड अन् तुकाराम मुंढेंची थेट मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनवर मोठी कारवाई
Tukaram Mundhe : आता थेट एफडीने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

Tukaram Mundhe : धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची राज्यभरात चर्चा आहे. त्यांच्या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आता एफडीएने थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर मोठी कारवाई केली आहे. कारवाईनंतर बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीन सील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एफडीएकडून राज्यभरात विशेष मोहिम राबवण्यात येत असून कारवाई सुरूच आहे. आता थेट एफडीने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकी काय कारवाई केली? (Tukaram Mundhe)
महानगरपालिका कॅन्टीनमध्ये दररोज ७ ते ८ हजारांपेक्षा अधिक लोक जेवून जातात, अशी माहिती आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी नागरिकांना तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे तक्रार करणे अधिक सुलभ झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कॅन्टीनबाबत नियमांचे उल्लंघटन होत असल्याची तक्रार एफडीएला प्राप्त झाली होती. तक्राराची दखल घेत संबंधित कॅन्टीनवर एफडीएच्या पथकाने बुधवारी रात्री अचानक धाड टाकली. तपासणीत आढळलेल्या स्वच्छतेच्या त्रुटींमुळे एफडीएने कठोर पाऊल उचलत कॅन्टीन सील केलं आहे.
ताकाच्या ग्लासात मेलेली माशी (Tukaram Mundhe)
एका ग्राहकाने दिलेल्या तक्रारीत ताकाच्या ग्लासात मेलेली माशी आढळल्याचं म्हटलं आहे. इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही. तर दुसऱ्या ग्राहकाने मागवलेल्या कांदा भजीमध्ये तळलेला प्लास्टिकचा धागा सापडला. या धक्कादायक प्रकारामुळे पालिका कर्मचारी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
तपासणीत नियमांची पालमल्ली
एफडीएने मुंबई महापालिकेत रात्रीच्या वेळी कॅन्टीनवर स्ट्राइक केला. एफडीएने धाड मारल्यानंतर कॅन्टीनची तपासणी केली. अन्न सुरक्षेच्या सर्व नियमांची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एफडीएने तात्काळ कठोर पाऊल उचलत कॅन्टीनला सील केले. या तात्काळ कारवाईमुळे एफडीए आणि तुकाराम मुंढेंचं कौतुक केलं जात आहे.
तक्रारीसाठी AI-आधारित व्यासपीठ
आता कुठेही जेवण किंवा औषध भेसळयुक्त आढळल्यास एफडीकडे तक्रार करण्यासाठी तुकाराम मुंढेंनी एक सोपा मार्ग तयार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला…तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी दिली आहे.






