Gandhinagar lokSabha| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १९ एप्रिल रोजी होती. त्यानुसार त्यांनी काल दुपारी 12.39 वाजता अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि त्यांच्या पत्नी सोनल शाह उपस्थित होते. 59 वर्षीय अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडला. आता दुसऱ्या टप्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांचा प्रचार सुरु आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज दाखल केले जात आहे. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित शहा यांनी उमदेवारी अर्जासोबत शपथपत्र दिले आहे.
त्यानुसार त्यांच्याकडे एकुण किती संपत्ती आहे याबाबतची माहिती समोर आली आहे. शहा यांनी त्यांच्या नामांकनात त्यांच्या संपत्तीचा तपशील दिला आहे. शहा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या उत्पन्नाचा तपशीलही दिला आहे. यामध्ये त्याने 2022-23 मध्ये 75.09 लाख रुपये कमावल्याचे सांगितले आहे.
अमित शाह यांची एकुण संपत्ती किती? Gandhinagar lokSabha|
अमित शहा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण 43.21 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांची जंगम मालमत्ता 20 कोटी रुपये तर स्थावर मालमत्ता 16 कोटी रुपये आहे. तसेच अमित शहा यांच्यावर 15.77 लाख रुपये इतके कर्ज आहे. अमित शहा यांच्याकडे फक्त 24,164 रुपये रोख आहेत. अमित शहा यांनी त्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही. व्यवसाय म्हणून ते शेती करतात आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदारांचा पगार, घर-जमीन भाड्याचे उत्पन्न, शेतीचे उत्पन्न आणि शेअर लाभांश उत्पन्न यांचा समावेश आहे. त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे.
याशिवाय त्यांच्याकडे 72 लाख किमतीचे दागिने आहेत. तर अमित शाह त्यांच्या पत्नीकडे 1.10 कोटी रुपयांचे दागिने आहेत, ज्यात 1620 ग्रॅम सोने आणि 63 कॅरेट हिरे आहेत. अमित शाह यांचे 2022-23 या वर्षात वार्षिक उत्पन्न 75.09 लाख रुपये आहे. अमित शाह यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 22.46 कोटी रुपये, स्थावर मालमत्ता 9 कोटी रुपये असून त्यांच्या 26.32 लाखांचे कर्ज देखील आहे.
2019 मध्येही अमित शाह यांचा विजय Gandhinagar lokSabha|
दरम्यान, 2019 मध्ये अमित शाह यांनी ही जागा 5 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. येत्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या सोनल पटेल त्यांच्या प्रतिस्पर्धी असणार आहेत. गांधीनगरमधून आतापर्यंत एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा: