“शरद पवारांचे राजकारण कोणीही संपवू शकत नाही”; अनिल देशमुखांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

Anil Deshmukh | भाजपच्या शिर्डी येथील अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपले आहे, असा दावा केला होता. तसेच त्यांना दगाबाज म्हंटले होते. अमित शाह यांनी केलेल्या या टिकेला शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, “भाजप सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जावू शकतात. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार देखील अशाप्रकारे पाडले. सत्तेसाठी शिवेसना फोडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन तुकडे केले आणि अडीच वर्ष सत्ता उपभोगली. त्यामुळे कोण दगाबाजीचे राजकारण करीत आहे हे स्पष्टच आहे,” असे शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
‘शरद पवार आणि त्यांचा पक्ष संपणार नाही आणि कोणी संपवू शकत नाही’
पुढे ते म्हणाले, “शरद पवार यांनी अनेक निवडणुका पाहिल्या आणि लढल्या आहेत. विजय – पराभव हा होतच असतो. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून शरद पवार आणि त्यांचा पक्ष संपणार नाही आणि कोणी संपवू शकत नाही. शरद पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात काय चत्मकार घडवून आणला हे सर्वांना माहिती आहे. महाविकास आघाडीची सत्ता आणली आणि भाजपला सत्तेपासून रोखले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठे यश मिळवून दिले.” Anil Deshmukh |
ईव्हीएम आणि लाडकी बहिणी योजनेमुळे यश
२०१४ मध्ये मोदी लाट असताना भाजपला विधानसभेत १२२ जागा मिळाल्या आणि यावेळी मात्र १४९ जागा लढवून १३२ जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या या यशात ईव्हीएम आणि लाडकी बहिणी योजनेचा मोठा वाटा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. Anil Deshmukh |
“दिल्लीत आम्ही स्वतंत्र लढत असल्याने गैरसमज करण्यात अर्थ नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टीने स्वबळावर लढावे, असे वाटते. त्या दृष्टीने काही बदल करावे लागतात. याचा अर्थ आघाडी तुटली असा होत नाही, ” असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. Anil Deshmukh |
हेही वाचा:





