…मॉब लिंचिंग नाही, हे चुकीचं आहे : ओवेसींची खोचक टीका

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशात मॉब लिंचिंगच्या वेगवेगळ्या घटनांविषयी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती की, ‘मॉब लिंचिंग’ ही एक पाश्चात्य पद्धत आहे आणि हि देशाच्या बदनामीसाठी भारताच्या संदर्भात वापरली जाऊ नये. ‘लिंचिंग’ हा शब्द भारतीय धर्मावरुन आला नाही, असा शब्द भारतीयांवर लादला जाऊ नये, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केलीय.
दरम्यान, ओवेसी यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका करत म्हणाले की, ‘या देशात धर्मनिरपेक्षता राहिलेली नाही. सर्वत्र हिंसक वातावरण आहे. व्देष पसरविला जातोय. पहिले तुमच्या गोडसेंना आवरा असंही ते म्हणाले. यापूर्वी दिल्लीत लहान मुलाला ठेचून मारलं जातं, केवळ मुस्लिम असल्यामुळे मारलं गेलेलं तबरेज प्रकरण ताजं आहे. असं असतानाही मोहन भागवत म्हणतात देशात मॉब लिंचिंग नाही, हे चुकीचं आहे याच देशात गुजरात, प्रकरण, दिल्ली मधील शीखांच हत्याकांड हे कुठे घडलं याचं उत्तर भागवतांनी दिलं पाहिजे.





