ना घर आणि ना गाडी, रोख रक्कम केवळ 50 हजार; अरविंद केजरीवाल यांची एकूण संपत्ती किती?

Arvind Kejriwal Net Worth | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या एकूण संपत्तीबाबतची माहिती समोर आली आहे. प्रतिज्ञापत्रात अरविंद केजरीवाल यांनी पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या संपत्तीचीही माहिती दिली आहे.
५० हजार रुपये रोख
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अरविंद केजरीवाल यांची एकूण १.७३ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याकडे ५० हजार रुपये रोख आणि २.९६ लाख रुपये बचत खात्यात आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे १.७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच, त्यांच्या नावावर कुठलेही घर अथवा गाडी नाही. Arvind Kejriwal Net Worth |
केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांच्याकडे एकूण अडीच कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामध्ये 1 कोटींहून अधिक किमतीच्या जंगम आणि 1.5 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. त्यात 320 ग्रॅम सोने (25 लाख रुपये), एक किलो चांदी (92 हजार रुपये) आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये एक घर आणि पाच सीटर कार आहे. त्यांच्याकडे केजरीवाल यांच्या तुलनेत अधिक संपत्ती आहे. Arvind Kejriwal Net Worth |
केजरीवाल दाम्पत्याकडे एकूण 4.23 कोटी रुपयांची संपत्ती
प्रतिज्ञापत्रानुसार केजरीवाल दाम्पत्याकडे एकूण 4.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2020 मध्ये दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी एकूण 3.4 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. 2015 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात, केजरीवाल यांनी आपली संपत्ती 2.1 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, दिल्लीत एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. Arvind Kejriwal Net Worth |
हेही वाचा :
Pune : ससूनवरचा ताण कमी होणार? स्वतंत्र रुग्णालयाचा प्रस्ताव तयार; राज्य शासनाची मंजुरी बाकी




