पोर्तुगालच्या सरकार विरोधात अविश्वास ठराव मंजूर

लिस्बन, (पोर्तुगाल) – पोर्तुगालचे पंतप्रधान ल्युइस मॉन्टेनेग्रो यांच्याविरोधात संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे पोर्तुगालमधील सरकारला राजीनामा द्यावा लागला आहे. सरकार स्थापन केल्यापासून अवघ्या एक वर्षाच्या आतच सरकार पडले आहे. या घडामोडींमुळे पोर्तुगालमध्ये ३ वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
संसदेत अविश्वास दर्शक ठरावावर झालेल्या मतदानाची नेमकी आकडेवारी लगेच उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु मध्यममार्गी -उजव्या विचारांच्या सरकारचा पराभव झाला आहे, असे संसदेचे सभापती जोस पेड्रो अगुआर-ब्रँको यांनी सांगितले. सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील दोन पक्षांची युती असलेल्या या सरकारला सध्याच्या २३० जागांच्या संसदेत फक्त ८० जागा मिळाल्या होत्या.
तेंव्हापासून हे सरकार अल्पमतातच होते. मॉन्टेनेग्रोचे प्रशासन आता काळजीवाहू म्हणून काम करेल, फक्त आवश्यक आणि तातडीच्या बाबी हाताळेल. अध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा संसद विसर्जित करतील आणि तात्काळ निवडणुका जाहीर केल्या जातील, अशी अपेक्षा आहे,





