“नो ब्रा, नो ब्लाउज’ श्वेता शिंदेचा मादक लूक व्हायरल; सोशल मिडीयावर कौतुक आणि ट्रोलही..!

मुंबई – ‘अवंतिका’ , ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून मराठी अभिनेत्री ‘श्वेता शिंदे’ घराघरात पोहोचलेली आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब श्वेता शिंदे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

काही वर्षांपूर्वी श्वेता अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. तिने झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’ आणि ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से, आगामी प्रोजेक्ट यासह स्वतःचे फोटो ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्वेता शिंदेनं आपल्या बोल्ड अँड स्टनिंग अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. नुकतंच श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

यातील एका फोटोत तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. फोटोमध्ये तिने ब्लाऊज घातले नसल्याचे पाहायला मिळत आहेत. तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. ‘नो ब्लाऊज,’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने तिच्या फोटोवर केली आहे. 

श्वेता मूळची साताऱ्याची असून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ती मुंबईत आली. मुंबईमध्ये महाविदयालयात असतानाच तिला अनेक मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. अतिशय सुंदर चेहरा आणि तिचा स्वतःवरील आत्मविश्वासामुळे ती आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.