अशोक सराफ आणि निवेदिता यांची जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र

Ashok Saraf and Nivedita | अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘महाराष्ट्राची आवडती जोडी’ तुम्हाला भेटायला येतेय अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली होती.
मात्र, यामध्ये या जोडीची ओळख रिव्हिल करण्यात आली नव्हती. मात्र प्रेक्षकांनी ही जोडी अशोक व निवेदिता सराफ यांची आहे असा अंदाज कमेंट्समध्ये आधीच व्यक्त केला होता. अखेर प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला असून, ही जोडी छोट्या पडद्यावर एका मालिकेच्या निमित्ताने एकत्र झळकणार आहे.
सराफ जोडीचं सुंदर नातं पुन्हा एकदा ‘अशोक मा.मा.’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर खुलणार आहे. अशोक सराफ यामध्ये मुख्य भूमिका आधीपासूनच साकारत होते. मात्र, या टीममध्ये आता निवेदिता यांची नव्याने एन्ट्री होणार आहे. याचा प्रोमो कलर्स मराठी वाहिनीकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. अशोक मा.मा. मालिकेतून संपूर्ण टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकाच मालिकेत एकत्र येणार आहेत.
View this post on Instagram
या प्रोमोमध्ये निवेदिता चिमुकल्या मुलांबरोबर प्रेमाने मजा-मस्ती करत असल्याचं पाहायला मिळतं. तर इतक्यात अशोक सराफ येऊन मुलांना ओरडतात. यानंतर दोघांची गोड जुगलबंदी या प्रोमोमध्ये पाहायला मिळतेय. निवेदिता सराफ यांचा साधा-सुंदर लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. Ashok Saraf and Nivedita |
या मालिकेत निवेदिता ताई ही भूमिका साकारणार आहेत. त्या उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका साकारत आहेत. त्या स्वतःचा ‘संस्कार वर्ग’ चालवतात. पण त्यांचा संस्कार वर्ग हा पारंपरिक चौकटीत बसलेला नसून दया,आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला आहे. Ashok Saraf and Nivedita |
हेही वाचा:
अभिनेत्री तेजश्री प्रधानची नवी सुरुवात; भूमिकेचे नाव सांगत शेअर केला हटके लुक





