जज़्बा है बिहारी, जुनून है बिहार ..! स्वातंत्र्यदिनी नितीश कुमारांची मोठी घोषणा,’10 लाख नोकऱ्यांसह 20 लाखांना रोजगार देणार’

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानातून मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्यातील 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच 20 लाख लोकांना रोजगार देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
या घोषणेने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, जे गेल्या आठवडाभरापासून उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्याच्या घोषणेवर सतत उत्तरे मागत होते.
अभिभावक आदरणीय मुख्यमंत्री श्री नीतीश कुमार जी का 76वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर पटना के गाँधी मैदान से ऐतिहासिक ऐलान:-
10 लाख नौकरियों के बाद 10 लाख अतिरिक्त नौकरियां दूसरी अन्य व्यवस्थाओं से भी दी जाएगी।
जज़्बा है बिहारी
जुनून है बिहार
उत्तम बिहार का सपना
करना है साकार— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) August 15, 2022
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की,’आता आपण एकत्र आलो आहोत आणि राज्यातील तरुणांना जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्या द्याव्यात, अशी आमची इच्छा आहे. ते पुढे म्हणाले की, ‘आमचे विचारही आता एक झाले आहेत.’
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांची ही घोषणा ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,”गांधी मैदान, पाटणा येथून 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालक, आदरणीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ऐतिहासिक घोषणा: 10 लाख नोकऱ्यांनंतर, 10 लाख अतिरिक्त नोकर्या इतर व्यवस्थेतूनही दिल्या जातील.’ असे म्हटले आहे.





