नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाब खेचला; RJD-काँग्रेसचा संताप, पहा व्हिडीओ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमात एका मुस्लिम महिला डॉक्टरला पत्र देताना नितीश कुमारांनी तिच्या चेहऱ्यावरील हिजाब स्वतःच्या हाताने खाली सरकवला. हा प्रकार पाहून उपस्थित काही जण हसले, तर महिला डॉक्टर काही क्षण अस्वस्थ दिसली.
हा कार्यक्रम सोमवारी पाटण्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यात १२८३ नवनिर्वाचित आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महिला डॉक्टर नुसरत परवीन यांच्याकडे पत्र देताना नितीश कुमारांनी हिजाबकडे इशारा करत ये क्या है जी? असा प्रश्न केला. महिला डॉक्टरने “हिजाब है सर” असे उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले हटाइए इसे आणि स्वतः हाताने हिजाब खाली सरकवला.
यह क्या हो गया है नीतीश जी को?
मानसिक स्थिति बिल्कुल ही अब दयनीय स्थिति में पहुंच चुकी है या नीतीश बाबू अब 100% संघी हो चुके हैं?@yadavtejashwi #RJD #bihar #TejashwiYadav pic.twitter.com/vRyqUaKhwm— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) December 15, 2025
या व्हिडिओवरून राजकीय वाद उफाळून आला आहे. राजद (RJD) ने नितीश कुमारांची मानसिक स्थिती दयनीय असल्याची बोचरी टीका केली आणि ते १०० टक्के संघी झाले असल्याचा आरोप केला. राजदने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत हँडलवरून शेअर करत नीतीश बाबूंना काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला.
काँग्रेसनेही या कृत्याचा तीव्र निषेध केला. पक्षाने म्हटले की, हे निर्लज्जपणा आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे असे नीच कृत्य केले आहे. यावरून बिहारमध्ये महिलांची सुरक्षा किती आहे, याचा अंदाज येतो. नितीश कुमारांनी या कृत्याबद्दल तात्काळ राजीनामा द्यावा. हे माफी योग्य नाही.
बिहार काँग्रेसनेही हा प्रकार लाजीरवाणा आणि निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. राज्यप्रमुखच जर सार्वजनिक व्यासपीठावर असे करत असतील, तर महिलांची सुरक्षाच काय? असा सवाल उपस्थित केला.





