“नितीश कुमार आदरणीय पण खेल अभी..” तेजस्वी यादव यांनी स्पष्टचं सांगतील

नवी दिल्ली – जेडीयु आणि राजद यांच्यातील महागठबंधन सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की बिहार मे खेल होना अभी बाकी है. राबडी देवी यांच्या निवासस्थानी राजद पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपल्यासाठी “आदरणीय” आहेत, परंतु असे अनेक घटक आहेत जे त्यांच्या “नियंत्रणात” नव्हते. “मुख्यमंत्री नितीश कुमार आदरणीय होते आणि आहेत. बऱ्याच गोष्टी त्यांच्या नियंत्रणात नाहीत. ‘महागठबंधन’मधील आरजेडीच्या मित्रपक्षांनी नेहमीच मुख्यमंत्र्यांचा आदर केला आहे असेही त्यांनी नमूद केले.
राज्यात अनेक अनपेक्षित घडामोडी घडण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. खेल अभी बाकी है असे त्यांनी यावेळी आग्रहपुर्वक नमूद केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझ्यासोबत स्टेजवर बसायचे आणि विचारायचे, २००५ पूर्वी बिहारमध्ये काय होते?” मी कधीच प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान जेडीयु महागठबंधन सरकार मधून बाहेर पडले तरी महागठबंधन सरकारला बहुमतासाठी केवळ आठ जागांची आवश्यकता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार बिहार मध्ये ७९ आमदार असलेला राजद हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्या खालोखाल भाजपकडे ७८ आमदार आहेत. डाव्या पक्षांकडे सोळा आमदार आहेत. कॉंग्रेचे १९ आमदार आहेत. जीतनराम मांझी यांच्याकडे चार जागा असून अन्य दोन आमदार आहेत.




