Nitin Gadkari : बंगाल, आसाममध्ये भाजपा जिंकेल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास
विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपसाठी पोषक स्थिती आहे. दोन्ही राज्यांत आमचा पक्ष जिंकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी व्यक्त केला.

Nitin Gadkari : विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपसाठी पोषक स्थिती आहे. दोन्ही राज्यांत आमचा पक्ष जिंकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी व्यक्त केला.
आसाममध्ये सलग दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. तिथे विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी पक्ष उत्सुक आहे. तर, बंगालमध्ये भाजप प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. यावेळी त्या राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर, गडकरी (Nitin Gadkari) पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी एकप्रकारे भाजप आसामची सत्ता राखणार असल्याचे आणि बंगाल काबीज करणार असल्याचे भाकीत केले.
बंगाली मतदारांमध्ये राजकीय बदलाची आकांक्षा वाढीस लागली असल्याचा दावा त्यांनी केला. मतदारयाद्या पडताळणीवरून (एसआयआर) बंगालमधील वातावरण तापले आहे. भाजपच्या राजकीय लाभासाठी ती मोहीम राबवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून केला जात आहे.
त्याविषयीच्या प्रश्नावर गडकरी (Nitin Gadkari) उत्तरले, राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर राजकारण करण्याची भूमिका भाजप घेत नाही. राष्ट्रीय हिताला प्राधान्यक्रमावर ठेऊन एसआयआर सारख्या मुद्द्यांकडे पाहायला हवे.






