नऊवारी साडी, केसात गजरा अन्… निर्मिती सावंत यांचा टेलिव्हिजनवर कमबॅक

Nirmiti Sawant | अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे. विनोदी स्वभावातून प्रेक्षकांच्या भरभरुन मनोरंजन करणाऱ्या निर्मिती सावंत यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अलीकडेच त्या ‘झिम्मा 2’ चित्रपटात पाहायला मिळाल्या होत्या. यानंतर आता निर्मिती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्या टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहेत.
निर्मिती यांनी झी मराठी’ वाहिनीच्या ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या महासंगमच्या विशेष भागांमध्ये एन्ट्री घेणार आहेत. नऊवारी साडी, नाकात नथ, केसात गजरा, कपाळावर मोठं कुंकू, दागिने अशा डॅशिंग अंदाजात त्या पाहायला मिळत आहे. Nirmiti Sawant |
View this post on Instagram
झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये निर्मिती सावंत लक्ष्मी निवासमधील लक्ष्मी आणि पारु मालिकेतील आहिल्यादेवी यांची मैत्रिण दाखवली आहे. प्रोमोमध्ये जुन्या आठवणी काढत ती त्या दोघींना चॅलेंज देताना दाखवण्यात आली आहे. या तिघींचं एकमेकींशी असलेलं नातं काय नातं आहे? हे आता यातून उलगडणार आहे. Nirmiti Sawant |
दरम्यान, ‘कुमारी गंगुबाई नॉन-मॅट्रिक’ या मालिकेतून निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनतर निर्मिती सावंत यांनी ‘फू बाई फू’, ‘जाडूबाई जोरात’, ‘१७६० सासूबाई’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. आता मोठ्या ब्रेकनंतर निर्मिती सावंत पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतल्या असल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा :





