Mrunal Dusanis : प्रिया मराठेच्या आठवणीत अभिनेत्री मृणाल दुसानिस झाली भावुक म्हणाली “आमच्या प्रत्येक कॉलमध्ये…”

Mrunal Dusanis : अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन कलाकारांसह सर्वांनाच चटका लावणार आहे. तिच्या अकाली एक्झिटने मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. अवघ्या ३८ व्या वर्षी प्रियाने जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबासाठी हे दुःख पचवणं खूप कठीण आहे.
प्रिया मराठेसोबत अनेक कलाकारांनी काम केलं आहे. काही कलाकारांनी तिच्यासोबत काम केलेल्या आठवणी शेअर केल्या आहेत. अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने देखील प्रियाच्या जाण्याने दुःख व्यक्त करत तिच्यासोबत काम केल्याची आठवण शेअर केली आहे.
प्रिया मराठे आणि मृणाल दुसानिस यांनी एकत्र एका मालिकेत काम केलं होतं. झी मराठी या वाहिनीवरील तू तिथे मी या अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिकेत दोघी होत्या. तेव्हापासून त्यांची मैत्री. जवळची मैत्रिण सोडून गेल्याचं दु:ख व्यक्त करताना मृणाल भावुक झाली होती. लोकमत फिल्मीसोबत मृणालने तिच्या आणि प्रियाच्या आठवणी शेअर केल्या.
खरंतर प्रिया मराठे कॅन्सर सारख्या गंभीर आजारशी झुंज देत असल्याचं फार कमी लोकांना माहिती होतं. याविषयी बोलताना मृणाल म्हणाली, आपल्या आयुष्यात आलेल्या संकटाला आपणच सामोरं जायचं, इतरांना या सगळ्याबद्दल कळू नये, असं प्रियाला वाटायचं. त्यामुळं तिनं कॅन्सरचं निदान झाल्यानंतरही हे फार कमी जणांना सांगितलं होतं. सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांना देखील हा फार उशीरानं कळालं.
प्रिया आणि मी कधीच एकमेकांना नावानं आवाजच दिला नाही, आम्ही एकमेकांना ये वेडे…अगं वेडे…अशीच हाक मारायचो. प्रिया इतक्या मोठ्या आजाराशी झुंज देतेय, हे आम्हाला फार उशीरा कळलं. तिनं हे पटकन बाहेर येऊ दिलं नाही. एकटी एकटीचं तिनं अनेक महिने हे सगळं सहन केलं. आत्ता आत्तापर्यंत काही दिवसांपर्यंत आम्ही तिच्याशी बोलत होतो. कशीयेस, काळजी घे… आमच्या प्रत्येक कॉलमध्ये प्रियाचा विषय निघायचाच, अशी आठवण मृणाल दुसानिस हिने शेअर केली.





