Nikki Tamboli : ‘निक्की तांबोळी’च्या हॉटनेसचा कहर, बोल्ड व्हिडिओने वाढवला इंटरनेटचा पारा…

मुंबई – ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की काही म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव असल्याचं नेहमी दिसून येत. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात.
निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असून, ती चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे. दरम्यान, असच काहीस निक्कीने पुन्हा एकदा करून दाखवलं आहे. हो… निक्कीने नुकतंच तिच्या अधिकृत इन्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये ती पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.
निक्की तांबोळी ज्या पद्धतीने तिची हॉट फिगर प्लॉन्ट करत आहे, ते पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले असून प्रत्येकजण निकीच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये निक्की कमालीची मादक दिसत आहे. सध्या तिचा हा हॉट अंदाजतील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनय कौशल्याव्यतिरिक्त, निक्की तिच्या चाहत्यांला जबरदस्त फॅशन सेन्ससाठी देखील आवडते आणि तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तिच्या सोशल मीडिया हँडल्सवर मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आहेत. कपड्यांच्या अविश्वसनीय निवडींचा विचार केला तर, फॅशन क्वीन निक्की तांबोळी नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे.





